शनिवार, २१ नोव्हेंबर, २०२६

राजे

राजे
***********

राजे जाणते मिळणे मुश्किलच आहे आता
खिसे फाटके शिवणे मुश्किलच आहे आता

मश्गुल सत्ता सामर्थ्यी गल्लीतला भाई छोटा
मग दिल्ली निवळणे कठीणच आहे आता

असू देत दुश्मन तो चीनही कधी पटतो 
स्थिति मध्ये या जगणे परीक्षाच आहे आता

सज्जन वाटत होते देशभक्त महान ते 
पाणी तया डोळ्यातले वेगळेच आहे आता

फक्त सत्ता हवी ज्यांना सुख अन् गादीतले 
त्यास खाली बसवणे अशक्यच आहे आता

ध्येय त्यांचे कसेही ते पुन्हा सत्तेत येण्याचे 
मूल्य माझ्या या मताचे रे शून्यच आहे आता

मणी एकाच माळेचे रंग जरी का वेगळे 
गूढ गोमुखीचे वर वेगळेच आहे आता

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

राजे

राजे *********** राजे जाणते मिळणे मुश्किलच आहे आता खिसे फाटके शिवणे मुश्किलच आहे आता मश्गुल सत्ता सामर्थ्यी गल्लीतला भाई छोटा मग...