मंगळवार, १० नोव्हेंबर, २०२६

दुरावा


दुरावा
******
माझिया मनाचे स्वप्न चांदण्याचे 
तुझिया मनाला कसे कळायचे
माझिया जीवाचे वेड सुमनाचे 
तुझिया पायाशी कसे घालायचे 

गूढ  कृष्णडोह असे चित्त तुझे 
मजलागी कसे बरे दिसायचे 
तना मनाचे हे बंधन काळाचे 
चाकोरीत नित्य त्याच फिरायचे 

होतो कासावीस पुन्हा पुन्हा जीव 
आसासून घेतो तुझ्याकडे धाव 
एकवार तुझी होवुनिया भेट   
मिटुनिया जावी दुराव्याची खंत

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुखाचे कोडींग

सुखाचे कोडींग *************** त्याच त्या सुखाच्या दीर्घ वर्तुळात  धावत असे जग दुःखांना टाळत. त्याच पुन्हा देवतांना नमन करत  तेच ...