उंटाच्या पाठीवरची काडी
*******************
उंट वाकला होता थकला होता तरीही चालत होता
आणि भीमाशंकरची ती
शेवटची काडी
पडली त्याच्या पाठीवर
अन् तो कोसळला.
आम्ही ज्याना देव मानलं
ज्याच्यावर विश्वास टाकला
तो नवसाला पावत नाही
हे कळत होत पण
पटत नव्हत आम्हाला
तरीही सहन करत होतो
ते सारेच
एक वांझ आशा बाळगून
पण आता तर ते ऐकतही नाही
खरच वाटत नाही आम्हाला.
जे झळाळावे चारित्र्यांने सदगुणांने
न्यायाने इमानदारीने पराक्रमाने
तेच जेव्हा माखुन गेले चिखलाने
तेव्हा आमचीच लाज वाटली आम्हाला.
ज्यानी मिरवावी
कीर्ती या देशाची या संस्कृतीची
आणि या धर्माची
ते फक्त घंटा वाजविण्यातच मग्न राहिले
आणि दानपेटीचा आकार वाढवत राहिले
तेव्हा आमच्या या एका मताची ही
कीव वाटली आम्हाला
वाटले ते होतील निरपेक्ष निराभिमानी
लढावू तेजाने तळपणारे
घराचे घरातल्या प्रत्येक माणसाचे
मुलाचे वृद्धाचे मावूलीचे कैवारी
पण ते दिसले गुंडांच्या टोळीत
तो सामील झाले लुटारूंच्या गर्दीत
आणि वाटत सुटले
आपल्याच खुश मस्कऱ्याना
आम्ही त्याच्या ताब्यात दिलेले
आमचे कष्टाचे डबोले
हसत आम्हाला.
आता तर
आमच्या असण्याची अस्तित्वाचीही
भीती वाटू लागली आहे आम्हाला.
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा