शनिवार, १० ऑक्टोबर, २०२६

धागे



हे धागे
******
हे धागे 
गर्भ रेशमी 
मऊ सुतेरी 
जरतारी

हे धागे 
दिसल्यावाचून
कळल्यावाचून
लपले वस्त्री

हे धागे
आज कालचे 
असे युगांचे
वा स्वप्नांचे

हे धागे 
अंबर झाले 
रे सजलेले 
कुण्या मनी

हे धागे
कुणी तोडले
विरून गेले 
कालगती .

हे धागे 
कळल्या वाचून 
पडले गुंतून 
खोलवरी

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वेडे प्रेम

वेडे प्रेम ***** वेड्या मनास सुचते  वेडेच एक गाणे  वेड्या सुरात भरते वेडेच नवे तराने वेडात सूर्य हसतो  येतो धरेस सुंदर  वेडी भिज...