******
हे धागे
गर्भ रेशमी
मऊ सुतेरी
जीवावरी
दिसल्यावाचून
कळल्यावाचून
लपले वस्त्री
हे धागे
आज कालचे
असे युगांचे
वा स्वप्नांचे
हे धागे
अंबर झाले
रे सजलेले
कुण्या मनी
हे धागे
कुणी तोडले
विरून गेले
कालगती .
हे धागे
कळल्या वाचून
पडले गुंतून
खोलवरी
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .