जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
सोमवार, २९ डिसेंबर, २०१४
रविवार, २८ डिसेंबर, २०१४
मेलेल्या बकऱ्याला
मेलेल्या बकऱ्याला
नाव नसते गाव नसते घर नसते दार नसते
प्रत्येक बकरा असतो
प्रथिनाचा ढीग
चविष्ट रुचकर
भूक वाढवणारा
चव जागवणारा
त्याचे हुंदडणे बागडणे
दुध पिणे चरणे
शिंग खाजवणे
सहज पुसून टाकता येते
विस्मृतीच्या फडक्याने
एका क्षणात
मालकाला धन मिळते
कसायाला फायदा
खाणाऱ्याला सुख ..
जन्मलेल्या प्रत्येक जीवाला
मृत्यू हा असतोच
असा नाहीतर तसा
त्याच्या देहाचे जन्माचे
सार्थक झाले
चला पान खावून येवू यात !
http://kavitesathikavita.blogspot.in/
शनिवार, २७ डिसेंबर, २०१४
देखणी
ती सुंदर गोरीपान
नाक डोळे छान असलेली
सुडौल तरुणी
अलीकडेच लग्न झालेली
सौभाग्याची लेणी नवी
देही मिरवणारी
जेव्हा काढू लागे
रस्त्यावरील कचरा
मुन्सिपाल्टीच्या गणवेशात
घेवून खराटा हातात
येणाऱ्या जाणाऱ्या असंख्य नजरा
उंचावत थबकत तिला न्याहाळत
काहीश्या नवलाने अचंब्याने
आणि खूपश्या वैषम्याने
अन जाता जाता बरेचसे ओठ
उगाचच वाकडे होत
ती सराईतपणे
इकडे तिकडे पहिल्या वाचून
आवरत असे आपले काम
जोडीदारीनीला देत साथ
एक एक ढीग उचलत
ढकल गाडी पुढे सरकवत
अन माझ्या डोक्यात
कुठेतरी ऐकलेले ते वाक्य
पुनःपुन्हा तरळून जाई
“नक्षत्रावानी देखणी
आहे माझी पोर
नक्कीच सजवीन
कुण्या राजाचं घर “!
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
गुरुवार, २५ डिसेंबर, २०१४
येशू आणि धर्मांतर
गोठ्यात जन्मलेला
क्रुसावर वधला गेलेला
येशू ख्रिस्त ..
तुमच्या आमच्या सारखा
खराखुरा माणूस
पण प्रभूप्रेमाने मस्त झालेला
आत्मभान आलेला
अवलिया ...
तत्वासाठी मृत्यू स्वीकारणाऱ्या
विरळया माणसांपैकी
एक अलौकिक व्यक्तिमत्व ...
त्याचे देवत्व वादातीत आहे
परमहंसागत..
पण धर्मांतर हा शब्द
त्या महात्म्याला
माहित असेल की नाही
या बद्दल मला शंकाच आहे
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
सूत्र
सूत्र ***** देऊन सूत्र जीवनाची सारी तुझ्या हातात आता मी रे निवांत आहे वाहत श्वासात जगणे चालू आहे नि धावणेही चालू आहे यशापयश दोघ...

-
तुझे डोळे ***** तुझे डोळे चांदण्यांचे बावरल्या हरीणीचे दूर कुठे अडकल्या गायीच्या गं दावणीचे . तुझे डोळे नवाईचे घनदाट...
-
सूत्र ***** देऊन सूत्र जीवनाची सारी तुझ्या हातात आता मी रे निवांत आहे वाहत श्वासात जगणे चालू आहे नि धावणेही चालू आहे यशापयश दोघ...
-
सोंगटी ***** कालचा पडदा तुझा मखमली कापडाचा आज झाला आहे जणू वज्रकाय पोलादाचा ॥ काल तुझी साथ होती क्षणोक्षणी संगतीला आज जणू काळ ...
-
झाकलिया घटीचा दिवा । नेणिजे काय झाला केधवा । यारीती जो पांडवा । देह ठेवी ...ज्ञानेश्वरी मरण ***** असे हवे रे सुंदर मरण ज्यात ओघळून जाईल ज...
-
संत **** झालास पतित वासनेत रत घडले अहित वेळोवेळा ॥ कृपाळू ते संत माऊली मनाचे देतील दयेचे परि हात ॥ बाहेर काढती सुस्ना...
-
ज्ञान सूर्य (डॉ.बाबासाहेब आंबेडकर ) ****** अफाट या कालप्रवाहात अगणित सूर्योदय होतात तेजस्वी प्रकाशमान शुभ्र अन विश्व उजळून टा...
-
रमण महर्षी कृत उपदेशसार कर्मयोग कर्त्याच्या आज्ञेने मुळी साकार जी होते कर्म कसे श्रेष्ठ ते तर तर जडच असते ll १ ll महा...
-
स्वामी शरण ******** आपल्या भक्ताशी सदा सांभाळीशी हृदयी वसशी स्वामी राया ॥१ ऐहिक कौतुके किती एक देसी सुखात ठेवीसी सर...
-
दीप ****** सांजवता दिन दीप उजळला दत्ताच्या समोरी हळूच ठेविला ॥१ दीप प्रकाशला गाभारा भरला तम दाटलेला क्षणी दुरावला ॥२ इवला प्रका...
-
रमेश बद्रिके एक लाडका बार्बर ********* म्हटले तर तो बार्बर होता म्हटले तर तो ड्रेसरही होता सर्वांसाठी धावणारा माणुसकी जपणारा ...