मंगळवार, २३ डिसेंबर, २०१४

एक चेहरा





एक चेहरा

पुन्हा सामोरा

येवूनी जरा

थबकला

तेच डोळे

गूढ काळे

कधी पहिले

होते मी

किती जुने

परी नव्याने

झाले भेटणे

तसे उगा

कुठले नाते  

नच आठवते

परी गाणे येते

तिज साठी



डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

जीवन जरा व मृत्यू

जीवन जरा व मृत्यू  *********** जीवन पथाला चालून म्हातारा थकला बसला घडीभर पाहतो जगाला पाहतो मनाला  घट्ट चिकटला  घरादारा म्हाताऱ्य...