शुक्रवार, ५ डिसेंबर, २०१४

ओरखडे मन झाले






कुण्या दु:खास रडावे
किती घाव सांभाळावे
भोवताली टोचणारे     
सवाल कसे जगावे |

ठरविले मीच होते    
जीवनास वल्हवावे
तुटताच होडी माझी  
दोष मी कुणास द्यावे  |

चालुनी येताच इथे  
पाया खाली गेली दृष्टी
कळे कुठे आलोय मी
हि वाट माझी नव्हती |

सुखांचीही बाधा होते
वाकलेल्या मनास या
चुकलेली वाट माझी
हरवली डोळ्यात त्या |

विझावे म्हणूनिया का
विझता येते दिव्याला
काळीज का कुरवाळी
आपल्याच वेदनेला |

घेवूनीया खांद्यावरी  
पुन्हा त्याच संभ्रमांना
वळता येते का कधी
सांजवेळी पावूलांना |

सांडिले सारे जरी मी
आधार वेडे मानीले
सुटता मनात पुन्हा 
नभ काळे झाकोळले 

मनावरी ओरखडे
ओरखडे मन झाले
स्पर्शणाऱ्या मृदुलाचे
हात अन रक्ताळले |

विक्रांत प्रभाकर






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तुझ्यासाठी

तुझ्यासाठी ********* मनावरी गोंदलेले नाव तुझे हळुवार सांग तुला दावू कशी प्रेम खूण अलवार ॥१ डोळ्यातील चांदण्यांना तुझ्या ...