शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०१४

आस्तिक
कश्यासाठी कष्ट सारे
सोसायाचे उन वारे
काही शब्द अन सल्ले
यावरी उंच मनोरे ||
स्वप्नही उसने होते
उसनेच सत्य हाती
चाकोरीत कालच्याच 
नित्य वाटे सारी गती ||
हात ज्याचे रिक्त त्याला
सारेच दाते वाटती
आशाळभूत होऊनी
दार दार ठोठावती ||
अहो स्वामी असा कुठे
कुणास ठावूक किंवा
उधळली वर्ष किती
धावतांना उगाच वा ||
जाब जरी मागू म्हणे
मीच माझा प्रतिध्वनी
आत बाहेर शोधूनी
न ये दृष्टीस कुणी ||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०१४

राजांच्या नावाला विसरली आहेत ||माझी ही मानसं
विटाळली आहेत
राजांच्या नावाला
विसरली आहेत ||
दुहीच्या द्वेषात
आपसात भांडत
मराठी मातीला
विसरली आहेत ||
सत्तेच्या मदाने
मातली आहेत
धनाच्या ढिगाला
हपापली आहेत ||
बोलणे माझे हे
ऐकणार नाहीत
मला ही कदाचित
ठेवणार नाहीत ||
परी मजला हे
ठावूक आहे
नावात त्या किती
ताकद आहे ||
पेटेल ज्वाला ती
पुन्हा धडाडून
जाईल हिणकस
अवघे जळून ||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
मुन्सीपाल्टीतील मित्रअफाट बुद्धीचा
गमत्या मुळचा
मित्र आमचा
आहे एक ||
कुठे कधीही
कुणा समोरही
बोले काहीही
जीभ घसरून ||
प्रेम खाण्यावर
साऱ्या डब्यावर
गोड धोडावर
ताव मारणारा ||
लेट येणारा
हळूच पळणारा
झोपा काढणारा
कामावरती ||
त्याचे देणे
असते घेणे
प्रत्येक नाणे
वाजवाजवून||
हा पगार तर
चालू राहणार
सही केल्यावर
घाई कसली ||
लोक येतात
लोक जातात
कामे होतात
आपोआप ||
आपण कशाला
हवे मरायला
चहा प्यायला
जाई सदा ||
त्याला कळली
देही मुरली
कोळून प्यायली
मुन्सीपाल्टी ||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/बुधवार, २६ फेब्रुवारी, २०१४

नामाभिधारण
किती सहज त्याने मजला सोडले
जुने खेळणे जणू मोडले फेकले
ते होते प्रेम अथवा व्यवहार खोटा
करणे सौदा एक दुजा ठेवून हाता
असे का सदा प्रीत कळेना कठीण
आदिम खेळ वा वाढविण्या वीण
व्यर्थ उमटतात उर्मी देही सनातन
मिटविण्या त्यास हे नामाभिधारण 

 विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

  

सोमवार, २४ फेब्रुवारी, २०१४

मुखवटे


    

आता कुणीही
माझी वाट कधी
पाहत नाही

म्हणती ज्ञानी  
कुणी कुणाचे नाही
या जगतात

व्हावे स्वागत
प्रेमळ उबदार
हवेहवेसे
  
आणि मिळावे   
गरम घास दो
भूक लागता

त्यापण आता       
दुर्मिळ वाटतात
गोष्टी अवघ्या

प्रेम मिटले
क्षणभर जुळले
बंध तुटले

दु:ख रुमाली
भिजल्या वाचून 
गेले फाटून

होते बहाणे
ते तुटणे खेचणे
प्रेम नव्हते    
 
आता फालतू  
दुनियेस्तव या हे  
खोटे जगणे

अन संसारी
उगाच मिरविणे
ते मुखवटे  

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

लायक

लायक ****** नच का लायक तुझ्या मी पदाला  सांगावे मजला दत्तात्रेया ॥१ अजुनी आत का भाव न जागला  भेटी न मजला म्हणुनी ती ॥२ उघडे सताड...