राज्य वाढले की
राजे वाढतात
मंत्री वाढतात संत्री वाढतात
एक सिंहासन पिढ्यान पिढ्याचे
काही घराणी सुरु होतात
जुन्या राजाचे चमचे पळतात
पित्ते हरवतात खंडणी घालवतात
एक भाकर सुवर्ण लखलखीत
चटकन अर्धी करून टाकतात
चार वेसकर सरदार होतात
दहा लॉटऱ्या नव्या लागतात
पण लोकांचे काय होते
पत्यावरचे राज्य बदलते
चार दिवस ते खुळ्यागत
गुलाल झेंडे मिरवत राहतात
नंतर मात्र तोच बाजार
तोच माल तीच येरझार
तेच शेत तीच बियाणं
नांगर शेत तेच खुरपण
तीच नोकरी पोटापुरती
रात्र
काढणे बाजेवरती
**** **** **** **
वाढोत
राज्य तुकडे पडोत
घर
कुणाचे वाडे भरोत
पण माणसास
या इथ
दोनवेळचा
घास मिळू देत
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा