गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०१४

राजांच्या नावाला विसरली आहेत ||



माझी ही मानसं
विटाळली आहेत
राजांच्या नावाला
विसरली आहेत ||
दुहीच्या द्वेषात
आपसात भांडत
मराठी मातीला
विसरली आहेत ||
सत्तेच्या मदाने
मातली आहेत
धनाच्या ढिगाला
हपापली आहेत ||
बोलणे माझे हे
ऐकणार नाहीत
मला ही कदाचित
ठेवणार नाहीत ||
परी मजला हे
ठावूक आहे
नावात त्या किती
ताकद आहे ||
पेटेल ज्वाला ती
पुन्हा धडाडून
जाईल हिणकस
अवघे जळून ||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

असणे

असणे ***** माझ्या असण्याचे गाणे  जेव्हा होईल नसणे  तेव्हा घडेल गवसणे दत्तात्रेया  तुझे  ॥ जैसे सदा सर्वकाळ व्यापुनिया आभाळ  राहत...