तमातून निघे
तमाकडे गाडेप्रकाश तुकडे
पांघरुनी ||१
जगण्याचा भार
शीर्ण मनावर सर्वांगी नकार
दाटलेला ||२
होते अगोदर
काय ते नंतर भयाने अंतर
काजळले ||३
फुटक्या प्रार्थना
अतृप्त याचनासजवुनी मना
निरर्थक ||४
असेल देहांत
जगताचा अंत अजीर्ण वेदांत
होत असे ||५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा