अहो चा मी आता
मिस्टर झालो आहे पुसलेल्या संसाराचा
डस्टर झालो आहे
नाही त्यात आता
काही वाउगे नाही शोभेचेच मी एक
क्लस्टर झालो आहे
देणे घेणे कुणाशी
उरले न काही माझे जगण्याचे वरवर
जस्टर झालो आहे
आणिला कुठून कुणी
टोचेना टोचून जो शब्द इंग्रजी एक
स्टिकर झालो आहे
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा