सोमवार, २२ जुलै, २०२४

आत्मभान


आत्मभान

********

आत्मभान यावे ।हृदयी ठरावे ।

चित्तात वसावे ।अनुभवे।।

हीच तळमळ ।लागली जीवाला ।

म्हणुनी धावला ।जीवराव।।

परी ठायी ठायी।लागली वळणे

सुखाचे छळणे।लाघवी ते।।

जीवन हा योग।कळल्यावाचूनी।

गुह्य उघडुनी।कोण दावी।।

*****

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तुझ्यामुळे

तुझ्यामुळे ********* माझ्या मधले    शब्द कोवळे  झाले मोकळे     तुझ्यामुळे  कधी कुठली     फांदी झुकली  बहरून आली    तुझ्यामुळे  ख...