बुधवार, ७ ऑक्टोबर, २०२६

वस्त्र

फाटके वस्त्र
*********
आधी देसी भक्ती मग ते दर्शन 
आहे मी जाणून दत्तात्रेया ॥१

परी त्या भक्तीला करसी लायक 
कृपेला कारक तूच देवा ॥२

मळके फडके घेई रे  धुवून 
मालिन्य काढून टाकी माझे ॥३

घडो काही तप कायचे वाचेचे 
आणिक मनाचे तुझ्या कृपे ॥४

जरी ना सुंदर करी तुझ्याजोगे 
पायपोस तागे पायरीचे ॥५

विक्रांत मळले विटले फाटले 
तुजला वाहिले वस्त्र दत्ता ॥६
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वस्त्र

फाटके वस्त्र ********* आधी देसी भक्ती मग ते दर्शन  आहे मी जाणून दत्तात्रेया ॥१ परी त्या भक्तीला करसी लायक  कृपेला कारक तूच देवा ...