रविवार, ११ ऑक्टोबर, २०२६

गोवा

गोवा
****
शोध सुखाचा गेला  दूरवर
अपार सागर करीत पार 
खूप उसळल्या लाटा लाटावर 
फेस उधळला किनाऱ्यावर 

देह भिजला नखशिखात 
पाणी गेले खारे डोळ्यात 
कुठले बाहेर कुठले आत 
कळले नाही असता वाहत 

माड हसले हसली माती 
मृत शिंपले वाळू वरती 
हा हा हा ची गाज भोवती 
फेर धरून नाचत होती

मी पण माझे स्तब्ध जळात 
हलल्या वाचून होते पाहत 
आणि रक्तीम दूर क्षितिजात 
सूर्य हरवला गर्द धुक्यात 

शोध सुखाचा खोल रुतला 
पाण्यावरती उगा नाचला 
आणि स्मृतीच्या डोहामधला 
जुनाच शिंपला हाती आला 

 🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

खडतर

खडतर ***** किती खडतर असे तुझी भक्ती  पाहूनिया मती कुंठीत ही  जरी बळ नाही आता माझे ठाई  तरी झोंबू पाही मिळवाया  जाणतो मी हीन  दीन...