गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२६

नाना पाटेकर

नाना पाटेकर
**********
नाना, 
जरी पंच्याहत्तर वर्षाचा होतास
 तरी फार लवकर गेलास
अचानक गेलास 
सुपर स्टार होतास 
पण सदैव घरातला वाटलास 

तुझे या मातीतले अस्सल मराठी पण 
तुझ्या बोलण्या चालण्यातून 
वागण्यातून  दिसायचे 
तसे तुला भेटलो सिनेमा 
मुलाखती भाषणातून 
आणि त्या सगळ्यातून 
तू खोलवर मनात
कधी उतरलास कळलेच नाही

तुझ्या साऱ्या भूमिका बघताना
ती अफलातून रंगवलेली व्यक्तिमत्वं पाहताना
तू ते पात्र जगताना दिसायचा 
त्यातील तुझा अजोड अभिनय दिसायचा 
गंम्मत म्हणजे त्या भूमिकेमागील 
नाना पाटेकर माझ्या मनातून 
कधीच पुसला जायचा नाही .
.
फार पूर्वी माझे बाबा नाटकात काम करायचे 
आणि ते नाटक बघायला आम्ही जायचो 
ते भूमिका सुंदर करायचे
पण ते आपले बाबा आहे 
हे आपल्या मनातून कधीच पुसल जायचं नाही 
तसं व्हायचं मला.
आपला नाना पाटेकर ती भूमिका करतोय 
हे जाणवत राहायचं

तसे तर तुझे हजारो लाखो चाहते 
महाराष्ट्रात आणि भारतात आहेत .
त्यातलाच मी एक आहे .
त्यामुळे नानाला जाऊन भेटावं 
त्याची सही वगैरे घ्यावी
आदर व्यक्त करावा 
असं कधी वाटलं नाही 
किंवा गरज भासली नाही .

पण आमच्या भाव विश्वामधील
तू एक आवडतं व्यक्तिमत्व 
होतास आहेस आणि राहणार आहेस

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नाना पाटेकर

नाना पाटेकर ********** नाना,  जरी पंच्याहत्तर वर्षाचा होतास  तरी फार लवकर गेलास अचानक गेलास  सुपर स्टार होतास  पण सदैव घरातला वा...