रविवार, २५ ऑक्टोबर, २०२६

भीक

भीक
******

उंचावले हात दुखू लागतात 
काय बळ नाही माझ्या याचनेत

सवे याचकांच्या धावतो गर्दीत 
कटोरा जपत आणि लपवत

कुणी उंचावर मिटक्या मारतो 
कुणी धुळीत वा उदास बसतो 

उदार दात्याचा पत्ताच लागेना 
भुकेली हावरी गर्दी ही हटेना 

चाचपतो पुन्हा माझा मी कटोरा 
कटोरा नव्हे हा देह जन्मसारा 

तोही दिसे हाती कुणा अज्ञाताच्या 
कोण मागे भीक दारात कुणाच्या

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भीक

भीक ****** उंचावले हात दुखू लागतात  काय बळ नाही माझ्या याचनेत सवे याचकांच्या धावतो गर्दीत  कटोरा जपत आणि लपवत कुणी  उंचावर मिटक्...