******"
करी रे पावन दत्ता माझे मन भक्तीत भिजून जावू दे रे ॥
आणिक ते नाही मागणे मनात
राही जीवनात भरूनिया ॥
नको नाव गाव नको धनमान
अखंड चिंतन तुझे घडो ॥
अगा अत्रिसुता देई ध्यान दान
सगुण निर्गुण मर्जी तुझी ॥
तव रूप नामी लाभावी उन्मनी
जगाचे सुटूनी खेळणी ही ॥
स्वीकारा स्वीकारा चित्ताची चाकरी
प्रभू गिरनारी योगीराजा ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा