सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२६

खडतर


खडतर
*****
किती खडतर असे तुझी भक्ती 
पाहूनिया मती कुंठीत ही

 जरी बळ नाही आता माझे ठाई
 तरी झोंबू पाही मिळवाया 

जाणतो मी हीन  दीन दयाघना 
करण्या तुलना काही नाही 

सदा भोगासक्त चित्त इंद्रियात
अभिमानग्रस्त जगतात

 घडले स्मरण तुझे भगवन 
तुझ्याच कृपेनं थोडेफार 

तीच ती पायरी घेई समजवून 
प्रथम मानून दत्तात्रेया

जाणतो चालणे जरी दूरवर
ठेव रे नजर दिनावर

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

खडतर

खडतर ***** किती खडतर असे तुझी भक्ती  पाहूनिया मती कुंठीत ही  जरी बळ नाही आता माझे ठाई  तरी झोंबू पाही मिळवाया  जाणतो मी हीन  दीन...