*****
दत्त जिवलग सोयरा धायरा झाला या पामरा पाठबळ .१
त्याने मज धीर आला समरात
संसारी वाहत असताना .२
घडे देणे घेणे लोक उपचार
चाले व्यवहार तया कृपे .३
अन्यथा कसले मजलागी ज्ञान
न कळे वर्तन जगताचे .४
दत्त चालविता म्हणून चालतो
जगती दिसतो संभावित .५
अन्यथा जगतो निरर्थ केवळ
जगण्याचा आळ वाहविता .६
ऐसा वृक्ष थोर केला उपकार
देऊन आधार पामरा या . ७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा