रविवार, ६ सप्टेंबर, २०२६

सार्थ करी दत्ता

सार्थ करी दत्ता
************
विश्वाचे कारण दत्त दयाघन 
आहे मी जाणून मनी जरी 

परी त्या कारणे होऊन जगणे
मीपण सरणे घडेचिना 

अशी माया ओढी मज जगजेठी 
अवघी तोकडी शक्ती पडे 

अगा अवघड संसार दुस्तर 
सांगे वारंवार  जगत्रय

परी तुझी माया असे तुझी छाया 
तिला सारावया  कृपा तुझी

देवाच्या भक्तांची लाज देवालागी 
येऊनिया वेगी तारी आता

विक्रांत जीवनी वाहे अहेतूक 
येऊन कौतुक दावी देवा 

सार्थ करी दत्ता तुझे देवपण 
मजला देऊन आलिंगन

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सार्थ करी दत्ता

सार्थ करी दत्ता ************ विश्वाचे कारण दत्त दयाघन  आहे मी जाणून मनी जरी  परी त्या कारणे होऊन  जगणे मीपण  सरणे घडेचिना  अशी म...