शनिवार, ५ सप्टेंबर, २०२६

दत्त कारणे

दत्त कारणे
****
घडो हे जगणे श्री दत्त कारणे 
अन्य न मागणे काही माझे 

घडावे एकदा दत्ताला भेटणे 
मी पण मिटने तया पायी 

स्वामी तो जगाचा माझी या मनाचा 
घडावा तयाचा संग काही 

जळाव्या इतर कामना वासना 
जेणे जन्म पुन्हा घ्यावा लागे 

दत्त प्रेमासाठी पुन्हा जन्मा येणे 
भक्तीत रंगणे मान्य पण

येई झडकरी दत्ता अवधूता 
आसरा विक्रांता देई पदा 
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

संसार

संसार **** संसार सरेना भोगणे ठरेना  जगणे पुरेना उपाधीला  एक तुटताच नवे उभे शिर  ऐसा कारभार वासनेचा  तेच जगी ताट तेच जगी पोट  येई...