मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२६

गणपती बाप्पा

गणपती बाप्पा 
***********
सगुणी राहू दे मज गुंतलेला 
पदी बांधलेला विनायका 

गजवक्रा तुझे रुप मनोहर 
दिसे लंबोदर  बहू गोड

घेऊ दे सदैव डोळ्यात भरून 
हृदयी ठेवून दयाघना

नामरूप तुझे विघ्नी आठवतो
तरूनिया जातो आपोआप 

घरोघरी जातो आरती रमतो
तुझे गीत गातो आनंदाने 

सदा घडो तुझे दर्शन भजन
नामाचे स्मरण गजानना 

एवढीच कर दया गणनाथा
आपुला विक्रांता म्हण बाप्पा 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गणपती बाप्पा

गणपती बाप्पा  *********** सगुणी राहू दे मज गुंतलेला  पदी बांधलेला विनायका  गजवक्रा तुझे रुप मनोहर  दिसे लंबोदर  बहू गोड घेऊ दे स...