विनायक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विनायक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२६

गणपती बाप्पा

गणपती बाप्पा 
***********
सगुणी राहू दे मज गुंतलेला 
पदी बांधलेला विनायका 

गजवक्रा तुझे रुप मनोहर 
दिसे लंबोदर  बहू गोड

घेऊ दे सदैव डोळ्यात भरून 
हृदयी ठेवून दयाघना

नामरूप तुझे विघ्नी आठवतो
तरूनिया जातो आपोआप 

घरोघरी जातो आरती रमतो
तुझे गीत गातो आनंदाने 

सदा घडो तुझे दर्शन भजन
नामाचे स्मरण गजानना 

एवढीच कर दया गणनाथा
आपुला विक्रांता म्हण बाप्पा 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

धागे

हे धागे ****** हे धागे  गर्भ रेशमी  मऊ सुतेरी  जीवावरी हे धागे  दिसल्यावाचून कळल्यावाचून लपले वस्त्री हे धागे आज कालचे  असे युगा...