छद्मदास
******
मोजतात शिक्के मतांचेच ॥१
फुटूनिया राहो फुटलेले गट
पडलेले तट समाजात ॥२
मनोमनी आग राहो पेटलेली
उगाच लागली द्वेषापोटी ॥३
एका हाती लाठी देऊन या मोठी
फोड ते म्हणती दुसऱ्यास ॥४
भेदांच्या भिंतीत मरे माणुसकी
तसे तुम्हा बाकी ठाव सारे ॥५
कळपी सामील शोधती सुरक्षा
धरतात आशा शहाणेही ॥६
घडवून गट इथे नवनवे
बांधुनिया थवे माणसांचे ॥७
राज्ये करतात कुटील मनाचे
होऊन जगाचे छद्मदास ॥८
विक्रांत उघड्या डोळ्यांनी पाहतो
अंतरी जळतो उद्वेगाने ॥९
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा