दत्त
****
दत्त भजावा मनात दत्त पहावा जनात दत्त धरावा उरात
सर्वकाळ
दत्त जाणावा सुरात दत्त ऐकावा स्वरात
दत्त वाचावा पदात
अनुपम्य
दत्त पूजावा मूर्तीत दत्त भजावा कीर्तित
दत्त स्मरावा प्रीतीत
सदोदित
दत्त प्रेमाचा पुतळा दत्त लावण्याची कळा
दत्त शांतीचाच मळा
मुमुक्षास
दत्त गातागाता मन गेले प्रेमाने भरून
दत्त कविता होवून
आले असे
दत्त मायबाप माझे दत्तकृपा छत्र माझे
दत्त जीवीचे प्रीतीचे
आत्मभान
ऐसे जाणूनिया दत्त झाला उगा हा विक्रांत
बसे एकटक दत्त
न्याहाळत
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा