सोमवार, २४ ऑगस्ट, २०२६

मागतो मी

मागतो मी
********
माझ्यासाठी तुझ्याकडे नच काही आराखडे 
जाणतो मी थकलेला
रुढार्थाने  सारे कसे इथे जीणे छान असे
पाहतो मी भोगलेला 
हवे मला जे जे काही अरे दृष्टीपुढे नाही 
जगतो मी ओशाळला 
तरी तुला आळवीत तुझे गुण आठवीत 
लिहतो मी सरावला 
आयुष्याच्या उताराला एकटाच सांडलेला 
राहतो मी कोंडलेला 
आशा पाशी गुंतलेला उरी घाव झेललेला 
हसतो मी उबगला 
नको देऊ काही जरी संसारात ठेवी तरी
राहतो मी गुंडाळला 
दिशा ध्येय हरवला धोंडा एक उताराला 
टाकतो मी कंटाळला 
जरी भुल जात नाही स्वप्न शिळी होत नाही 
ठेवतो मी फडतळा 
दिसे दिन सरलले निखारेही विझलेले 
टाकतो मी कोपऱ्याला 
जुने सारे सरू दे रे खरे खुरे जगू दे रे 
मागतो मी संचिताला
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागतो मी

मागतो मी ******** माझ्यासाठी तुझ्याकडे नच काही आराखडे  जाणतो मी थकलेला रुढार्थाने  सारे कसे इथे जीणे छान असे पाहतो मी भोगलेला  ह...