मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२६

नर्मदा कृपा


नर्मदा कृपा 
********
नव्हतीच खात्री जराही मजला
परी तू हाताला
धरीलेस ॥
नव्हते ठावुक चालेल की नाही 
धाडस तरीही 
केले काही ॥
होतीच देहाची विकल या दशा 
थकल्या जीर्णश्या
वस्त्रागत ॥
कीर्ती ती कृपेची होती मी ऐकली
साधूनीं गाईली
वारंवारं ॥
होता तेवढाच मजला आधार 
तया जीवावर 
निघालो मी  ॥
नच तू धाडले परत माघारी 
दया दीनावरी 
केली माय ॥
विक्रांत कृतज्ञ तुझा जन्मभर
वाहीलास भार 
सदा माझा ॥ 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विनायकास मागणे

मागणे ******* गुणाकार मन माझे गणाकार व्हावे आता  अहंकार भंग करी देवा तुच एकदंता ॥ देह बुद्धी नको आता मागणे हे वक्रतुंडा  संत संग...