मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२६

कर्म


कर्म 
****
कर्मात गुंतला काय व्यवहार 
अनंत अपार जीवनाचा 
कर्मातून कर्म घडतसे जन्म 
दिसे अंतहीन प्रवास हा

थांबू म्हणूनही थांबता येईना 
उतार माईना डोळीयात 
मग अनुचित अथवा उचित 
आपल्या हातात एवढेच 

मज कर्मफळ गमे काल्पनिक 
चालविण्या लोक नीतीवर 
कुणा कळे जन्म आणिक मरणे
आगा हे वाहणे प्रवाहात

तरीही घडावे जगणे सुंदर 
उदात्त उदार प्रेममय
स्वर्ग आशेविन नर्क भयाविन 
जन्म फळाविन काल्पनिक

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मनशून्य

शून्य **** मनाच्या गाभारी प्रगटले शून्य  जन्म प्रश्नचिन्ह पांघरले ॥१ मोडले पडले इमले बांधले  स्वर्गावरी गेले स्वप्न वेडे ॥२ वात ...