तेच तेच मागणे
***********
तेच तेच मागणे रे पुन्हा त्याच देवालयीअरे कशा जात नाही या भिकारड्या सवयी
धन देई यश देई गाई गुरे बळ देही
मागण्यात भय थोर नसे भरवसा काही
देतो देव घेतो काय तेही नीट ठाव नाही
सजलेल्या दुकानात भक्त गिऱ्हाईक होई
धनामना पलीकडे दिव्यत्वाचा शोध काही
मान्य जीवा असतेच अतृप्ततेची जाण ही
तीच ती रे प्रार्थना तीच असे आराधना
धरूनिया तिला सवे जगावे रे या जीवना
बाकी सारा व्यवहार भय व्यथा कारभार
पांघरुनी भक्ती कंथा मन शोधते आधार
बदलती देश तसे देव ही बदलतात
आधार भय चिंतेचे तसेच ते राहतात
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा