रविवार, ३० ऑगस्ट, २०२६

येणे जाणे

येणेजाणे
*******
आता येणे घडू नये उडणाऱ्या पाखराला
आता देणे उरू नये पराधीन फकीराला ॥

देह काळा बांधलेला क्षणोक्षणी वाहू गेला 
कुठवर सांभाळू या चार-पाच दिवसाला ॥

विश्व चक्री बांधलेले चाक झिजू झिजू गेले 
संपताच बळ त्याचे आता हवे बदलले ॥

परी ती जाणीव वेडी करतसे खळखळ 
येणे जाणे बदलणे व्यर्थहीन आहे खेळ ॥

शोधणाऱ्या सापडते आहे कुठे लिहिलेले 
अनुभवाविन पण हवे थोडे चाललेले ॥

जाण्याआधी जाणण्याचा डाव हवा खेळायला 
जाणे तर होणारच पण हवे कळायला ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येणे जाणे

येणेजाणे ******* आता येणे घडू नये उडणाऱ्या पाखराला आता देणे उरू नये पराधीन फकीराला ॥ देह काळा बांधलेला क्षणोक्षणी वाहू गेला  कुठ...