शनिवार, १ ऑगस्ट, २०२६

कोरलेले

कोरलेले
*******
लिहले मनात काही
पुसता सहज येते
ह्र्दयात कोरलेले
मिटता कधी न येते 

असतेच विश्व छोटे 
अदृष्य कधी कधी ते 
आकाश चांदण्याचे हे
कधी विझत नसते

येतात ऋतू किती नि 
वय ओघळून जाते
मन कोवळे क्षितीजी 
विभ्रमात दंग असते

म्हणतात शाप कुणी 
वरदान तेच असते 
असती भाग्यवंत जे
स्वप्न तयास भेटते 

पाहून तयास सुखे
पुन: पुन्हा धन्य व्हावे
क्षण भेटले अमुल्य
उरात सदा जपावे 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तू गेल्यावर

तू गेल्यावर ********* असणे तुझे जीवनाला अवघे व्यापून होते  प्रेमानुबंध क्षणाक्षणाला सदैव बांधून होते  प्रेमवृक्ष तू आयुष्यात माझ...