गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२६

झुळूक

झुळूक
******
या प्रार्थना प्रदक्षिणा 
साऱ्याच व्यर्थ आहे
कृष्णाविन कुरुक्षेत्री 
भटकतो पार्थ आहे 

ये आडवी सदैव इथे 
माणसाची जात आहे
नात्यात गुंतलो वृथा 
तरी जगणे वाहत आहे

वेचलेले हरेक फुल  
जपले या मनात आहे 
क्षण सुखाची माळ परि 
आता ओघळत आहे

ना वांछीले सौख्य कधी 
जाणून माझ्यात आहे 
जे होते आणि आहे ते 
जाणले की सरत आहे

नव्हतेच ओझे कश्याचे 
असणे तरंगत आहे
परी दिसली न झुळूक ती 
प्राण जिला शोधत आहे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दर्शन

दर्शन ***** आलो तैसा गेलो कळल्या वाचून घडले दर्शन विठ्ठलाचे ॥१  वाया न हे जावे क्षण दर्शनाचे म्हणून डोळ्यांचे द्वार टक्क ॥२ चालण...