बुधवार, ९ सप्टेंबर, २०२६

कृपेची घागर

कृपेची घागर
***
कृपेची घागर ओत डोक्यावर 
जावा मनोमळ वाहूनिया  ॥१

घेई रे कृपाळा तुझा तू करून 
शुचित्व देऊन दगडा या  ॥२

जगत हे व्यर्थ मनी समजलो
तव पदी आलो दत्तात्रेया ॥ ३

चुकला विचार बाटला आचार 
करी रे स्वीकार प्रक्षाळून ॥  ४

माय तू स्नेहाळ प्रेमाची केवळ 
चुकल्या सांभाळ लेकरा या ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कृपेची घागर

कृपेची घागर *** कृपेची घागर ओत डोक्यावर  जावा मनोमळ  वाहूनिया  ॥१ घेई रे कृपाळा तुझा तू करून  शुचित्व देऊन दगडा या  ॥२ जगत हे व्...