***
कृपेची घागर ओत डोक्यावर
जावा मनोमळ वाहूनिया ॥१
घेई रे कृपाळा तुझा तू करून
शुचित्व देऊन दगडा या ॥२
जगत हे व्यर्थ मनी समजलो
तव पदी आलो दत्तात्रेया ॥ ३
चुकला विचार बाटला आचार
करी रे स्वीकार प्रक्षाळून ॥ ४
माय तू स्नेहाळ प्रेमाची केवळ
चुकल्या सांभाळ लेकरा या ॥५
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️