बुधवार, १६ सप्टेंबर, २०१५

संपले दिवस






 
संपले दिवस
असे तसे काही
सरतील हे ही
कधी काळी
  
मरणाचा डोळा
सदा रोखलेला
गुंगारा जमला  
कधी कुणा

संपती विपत्ती
आसक्ती विरक्ती
सारी खेळासाठी
आटाआटी

किती खेळायाचे
कुणासाठी असे
कुणालाही नसे
भान त्याचे

आणिक धूसर
काही खाणाखुणा
खुणावती मना
हळुवार

असेल का अंत
यया धावण्याचा
नवीन खेळाचा
आरंभ वा  

किती बोलावती
वेगळाल्या रिती
पाऊलात भिती
खिळलेली

 विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बाबा

प्रिय बाबासाहेब  *********** कृतज्ञतेच्या किनाऱ्यावर येवुन  तुम्हाला करतो आहे मी अभिवादन  कुठलाही रंग कुठलाही झेंडा  हातात घेतल्...