मंगळवार, ८ सप्टेंबर, २०१५

येऊर ..(जंगलातील खेडे )


 

हिरव्या जमीनी  
कुणाच्या ताब्यात
घालून कुंपणे
बसल्या वेढ्यात

फाटका मालक
गेला देशोधडी
अथवा घरात
झाला घरगडी

नव्वद वर्षांचा
जाहला करार
गेली खुळखुळ
दिवसात चार

बांधले महाल
कुणी चमकीले
आश्रम इमले 
कुणी सजविले

सारे राजरोस
धन जोरावर  
अन सरकारी
कृपेची नजर

आता तर राजा
बदले नियम
होवून दलाल
मागतोय दाम   

अन हिरवाई
सारी झाकोळली
खाचर गाडली
सिमेंटच्या खाली

वाढतेय प्रजा
भुकेले बिल्डर
जणू टपलेला
बोका लोण्यावर

उरेल कागदी
काहीसे जंगल
मग माणसाचा
वंश ही मरेल

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...