बुधवार, ९ सप्टेंबर, २०१५

बहुदा हिशोब संपला असावा ...







मी वाचत बसायचो तिच्याशी मारलेल्या गप्पा
whats app वरच्या facebook वरच्या
पुन:पुन्हा.. ऑफलाईन झाल्यावर
सेव्ह करून ठेवलेल्या वर्ड फाईल मधल्या  
त्यात होते तिचे उलगडलेले मन आणि स्वप्न
तिच्या काळजावर झालेल्या जखमा
आणि दुरावल्या जीवलगांच्या गोष्टी
तिने सांगितलेली हृदयस्थ गुपिते ..
मी तिचे केलेले सांत्वन घातलेली समजूत 
कधी केलेल्या काही चेष्टा घातलेली कोडी
कधी केलेले कौतुक दिलेल्या सूचना
सावध केलेले चुकापासून अन दिले होते सल्ले ...
आणि हळू हळू मला दिसू लागले   
माझे तिच्यात नकळत अडकणे  
अगदी कटाक्षाने टाळूनही
बोटातून निसटणारी वाहवा अन हळवे शब्द
खरतर फक्त मैत्री होती ती सीमा रेखा आखलेली
तिच्या गोष्टीतून बोलण्यातून अन वागण्यातून
तिने दिले मला हजार शब्द लाख कल्पना
तरीही पडलेच काही तडे काही ओरखडे
समज गैरसमजाचे दाटले गर्द धुके
आणि एक दिवस दिसलीच ती संपलेली मैत्री
आणि झालेली अखेर त्या साऱ्या गप्पांची
वाचता वाचता अखेर मलाही जाणवला 
त्यातील फोलपणा मूर्खपणा अपव्यय वेळेचा
आणि मग त्या साऱ्या फाईलींना
मी दाखवला रस्ता रिसायकल बिनचा  
पण डिलीट करूनही सारंच डिलीट होत नसते
मन म्हणजे संगणकाची मेमरी नसते
राहील ते सारे पडून आत कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात
उमटेलही कधी कुठल्या कवितेत
कारण शेवटी जीवनात जे घडायचे ते घडते
जणू काही ते जुनेच देणे घेणे असते
अन बहुदा आता हा हिशोब संपला असावा !

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/




 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीपाद सखी

श्रीपाद सखी *********** स्वप्न हरखले डोळीया मधले  स्वप्नास लंघुनी स्वप्न हे उरले ॥१ नभात लक्ष दीप उजळले  अन चांदण्याचे तोरण जाहल...