हरवत जाते एक एक वाट
विस्मृतिच्या घनदाट रानात
रुळलेले पावूल अड़कते
अनोळखी कुण्या जाळ्यात
मी माझे सारे ओळखीचे
गाव हरवते कुण्या डोंगरात
धावायचे आता कशाला
दीप विझतात अंध हातात
विखुरतात हाका साऱ्या
कपारीतील खाचखळग्यात
हळूहळू अन भान हरवते
या इथल्याच घन गोंगटात
कधी कुठली चांदनी अन
मेघ सावळा येतो नभात
गूढ़ गुपित काळी सावळी
उमलु लागतात अंतरात
तेवढाच मी माझा होतो
उगाच सुटतो गाणे गात
नि बरेच काही होते आत
सुटते आणि बसते गाठ
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा