शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०१५

धुवांधार ॥ नर्मदे हर ॥




झोकूनिया देह इथे हा
परतून पुन्हा न यावे
बिंदूने बिंदूत जिरावे 
कणकण इथला व्हावे

रेवामैयाच्या कुशीतील  
बालक इवला मी व्हावे
पुन्हा पुन्हा परिक्रमा नि
जन्म सारे इथेच यावे   

पद चुंबित साधकांचे
पथ अलवार करावे
लक्ष्य अलक्ष्य लिंगांना
अविरत मिठीत घ्यावे

ओमकाराचा नाद तिच्या
प्रपातात विरघळावे
पुत्र तिचा मी पुत्र तिचा मी
जिणे एवढेच राहावे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...