बुधवार, २३ सप्टेंबर, २०२६

धिंडोरा

धिंडोरा
******
तुझिया कीर्तीचा पिटतो धिंडोरा   
दत्त दिगंबरा पानोपानी ॥

पाहिल्यावाचून  वर्णीतो रूपाला
गातसे कीर्तीला जागोजागी ॥

तुझिया कृपेचा देतो भरवसा 
पल्लवीत आशा करूनिया ॥

भरल्यावाचून माझी रिती झोळी 
करतो दिवाळी साजिरी मी ॥

मागे बहुतांची फळली रे भक्ती 
तया दत्त प्रीती फळा आली ॥

त्याच कथा गोड जीवी ठसवितो 
दास म्हणवतो आशेने मी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धिंडोरा

धिंडोरा ****** तुझिया कीर्तीचा पिटतो धिंडोरा    दत्त दिगंबरा पानोपानी ॥ पाहिल्यावाचून  वर्णीतो  रूपाला गातसे  कीर्तीला जागोजागी ...