बुधवार, २ सप्टेंबर, २०२६

श्री वासुदेवानंद सरस्वती


प.प.श्री वासुदेवनंद सरस्वती महाराज
****************

आनंदकंदा श्री वासुदेवनंदा 
तोडी भावबंधा आमच्या तू

देई ज्ञान शक्ती देई भावभक्ती 
घालतो मी मिठी तव पदी 

देई गा सन्मती देई बा विरक्ती 
सदाचार नीती कळू दे रे

कळू दे आचार कळू दे विचार 
देई रे आधार मजलागी

घडली ना कधी सेवा आजवर 
भेटी कृपाकर परी तू गा 

तुझिया शब्दात भजले दत्ताला 
व्यक्तअव्यक्ताला कृपा तुझी

तुच दत्त रूप आता रे आम्हाला 
चालवा सांभाळा भक्ती पंथा

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्री वासुदेवानंद सरस्वती

प.प.श्री वासुदेवनंद सरस्वती महाराज **************** आनंदकंदा श्री वासुदेवनंदा  तोडी भावबंधा आमच्या तू देई ज्ञान शक्ती देई भावभक्...