हट्ट
***
हाच हट्ट माझा पुरा करी देवा यावे भक्तीभावा फळ माझ्या
जाणतो कोरडा तूप तेलाविन
आलो मी घेऊन नैवेद्य हा
फुले बाजाराची कुठल्या काळाची
बोटे व्यापाराची लागलेली
धूप गंधाकडे नच लक्ष काही
डोळ्यानी मी पाही तुज फक्त
तुजला स्मरता प्रेमात रंगता
जाहलो चुकता उपचार
नको अन्य काही मज तुजविण
हृदयी येऊन रहा फक्त
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा