सोमवार, १७ ऑगस्ट, २०२६

जगदीश महाराज (झगडीया मढी)


जगदीश महाराज  (झगडीया मढी)
 नर्मदाकाठच्या कविता
***************************
निर्मळ डोळ्यांचा मधुर वाणीचा 
नर्मदा तीरीचा साधू एक ॥१

जरी भला मोठा मांडला पसारा 
नव्हता रे वारा अहंकारा ॥२

पुसे एकेका येऊन कुशल 
आग्रह प्रेमळ शब्दांमध्ये ॥३

जणू जंगलात मधुर रसाचा 
तरू हा फळांचा भरलेला ॥४

जणू वाटेवर वृक्ष चंदनाचा 
शितल छायेचा श्रमल्यांना ॥५

पुत्र नर्मदेचा भेटला मायेचा 
स्पर्श माहेरचा मना झाला ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

जगदीश महाराज (झगडीया मढी)

जगदीश महाराज  (झगडीया मढी)  नर्मदाकाठच्या कविता *************************** निर्मळ डोळ्यांचा मधुर वाणीचा  नर्मदा तीरीचा साधू एक ...