मन
.****
मनातून मन वजा होत नाही आणि जन्म वाही जीवनाला ॥१
धनामागे मन देवद्वारी मन
शोधे कणकण सुखाचाच ॥२
अस्थिर अभंग मनाचे तरंग
बदलती रंग क्षणोक्षणी ॥३
कधी विलक्षण पाहून भोगून
जाते हरपून मन वेडे ॥४
तेच विलोपन शून्य आठवून
भोगू पाहे क्षण त्याच रीती ॥५
मना न कळते तेव्हा ते नव्हते
आनंदच होते शब्दातीत ॥६
मना जे कळते मना जे दिसते
अरे ते नसते शोधलेले ॥७
विक्रांत मनाचे पाहतो नर्तन
अतळ जाणून अस्तित्वास ॥८
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा