पान फाडतांना
*********†*
मन शोधू नको माझेतू शब्दात सांडलेले
अन सांगू नको पुन्हा
जोडाक्षर चुकलेले
होतेच वादळ वेडे
क्षण एक धरा आले
विखरून खेळ सारे
शुन्यी हरवून गेले
आकाश निरभ्र आता
हि वाळू तीरावरली
पुसल्या पाऊल खुणा
ज्या पुसणे होते भाळी
गणणेला अर्थ नाही
मौनाने वाढते अंतर
विस्मृतीत सुखदायी
चालते जीवन सुंदर
घे खोल उरी श्वास
तू पान उलटतांना
दिसणार नाही कुणा
तू पान फाडतांना
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा