शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२६

श्रीदत्त

श्री दत्त
******
सारे व्यापूनी जगत 
व्यक्त अव्यक्त रूपात
विश्व पालक श्रीदत्त ॥१

शून्य होऊन निर्वात
गिळे सारे आसमंत 
शिव संहारक श्रीदत्त ॥२

चंद्र सुर्य प्रकाशात
खेळ खेळतो अद्भूत
ऐसा लीलाधर श्रीदत्त ॥३

नच कळता कळत 
ठसा उमटे चित्तात 
ऐसा अगम्य श्रीदत्त ॥४

जरी रुप नामातित 
परी पाहता मनात 
दिसे भक्तास श्रीदत्त ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

खडतर

खडतर ***** किती खडतर असे तुझी भक्ती  पाहूनिया मती कुंठीत ही  जरी बळ नाही आता माझे ठाई  तरी झोंबू पाही मिळवाया  जाणतो मी हीन  दीन...