कर्मफळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कर्मफळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२६

कर्म


कर्म 
****
कर्मात गुंतला काय व्यवहार 
अनंत अपार जीवनाचा 
कर्मातून कर्म घडतसे जन्म 
दिसे अंतहीन प्रवास हा

थांबू म्हणूनही थांबता येईना 
उतार माईना डोळीयात 
मग अनुचित अथवा उचित 
आपल्या हातात एवढेच 

मज कर्मफळ गमे काल्पनिक 
चालविण्या लोक नीतीवर 
कुणा कळे जन्म आणिक मरणे
आगा हे वाहणे प्रवाहात

तरीही घडावे जगणे सुंदर 
उदात्त उदार प्रेममय
स्वर्ग आशेविन नर्क भयाविन 
जन्म फळाविन काल्पनिक

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

डॉ. मनीष दोशी Dy MS राजावाडी हॉस्पिटल (निवृती दिना निमित्त)

डॉ. मनीष दोशी राजावाडी हॉस्पिटल (निवृती दिना निमित्त) ***************** खर तर तुम्हाला सांगायची गरज नाही डॉ.मनीष, हे एक विलक्षण ...