तुझिया कृपेची
होय बरसात
अपार श्रीमंत
झालो आज ||१||
काय कुठे ठेवू
कळेना मनाला
जीव भारावला
हरखून ||२ ||
खरे खोटे काय
चिमटा घेवून
घेई आकळून जागेपण
||३||
मोकळे जाहले आज
मी पण
उरले कारण धारणेला
||४ ||
मागितल्याविन
उगवला क्षण
आनंद दाटून आसमंत
||५ ||
नव्हते आसन
त्रिकुटीत मन
खुले नभांगण
छतावरी ||६ ||
तरीही तोच मी
जाणीव तरल
व्यापुनी केवळ
उरलेलो||७ ||
कोण तो विक्रांत
कुठे हरवला
असुनी नसला
देखियेला ||८||
विक्रांत
प्रभाकर तिकोणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा